Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रसिद्ध अभिनेत्रीला देहविक्रीचे रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक

बॉलीवूडमधील सेक्स रॉकेटचा पर्दाफाश, दोन मॉडेलची सुटका, बाॅलीवुडमध्ये खळबळ

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- मुंबई क्राईम ब्रॅन्चने बॉलिवूडमध्ये सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री दिग्दर्शन आरती मित्तल हिला अटक केली आहे. क्राईम ब्रॅन्चच्या यूनिट ११ ने डमी कस्टमर पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी दोन मॉडल्सची सूटका देखील करण्यात आली आहे.

पोलीस अधिकारी मनोज सुतार यांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहकांना हॉटेलवर पाठवत हे प्रकरण उघडकीस आणलं. त्यांनी आरती मित्तलकडे दोन मुलींची मागणी केली. यासाठी ६० हजार रुपये आरतीने मागितले होते. त्यानंतर आरती मित्तलला दोन मुलींना घेऊन हॉटेलवर बोलविण्यात आलं होतं. यामध्ये सामील होण्यासाठी आरतीने अधिक पैशांची मागणीही केली होती. आरती हॉटेलवर येताच पोलिसांनी तिला अटक केली. मुंबई पोलिसांना अभिनेत्री आरती मित्तल हिला अटक केली आहे. तिने पैशाचं आमिष दाखवून आतापर्यत मुंबईत आलेल्या अनेक मॉडल्सला देहविक्री व्यवसायाच्या दलदलीत ढकलल्याची माहिती मिळाली आहे. आरतीसोबत या सेक्स रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण गुंतलं आहे, याबाबत पोलिस सखोल तपास करत आहेत. आरती मित्तल ही अभिनेत्रीसोबत ती एक कास्टिंग डायरेक्टर देखील आहे. तिने ‘अपनापन’ सह अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये काम केलं आहे. इंडस्ट्रीतील ती लोकप्रिय अभिनेत्री आहे. आता क्राईम ब्रॅन्चने आरती मित्तल हिला अटक केली असून दोन्ही मॉडल्सची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.

 

काही दिवसापूर्वी आरतीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये तिने आर माधवनसोबत चित्रपटात काम करण्याची माहिती दिली होती.दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत तसेच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!