मुख्यमंत्र्यांच्या बहिणेने पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात
वाद घालत मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, बघा नक्की प्रकार काय, आक्रमकता का?
हैद्राबाद दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ज्या प्रमाणे घराणेशाहीचा आरोप होत आला आहे. तसा तो इतर राज्यातही होत आहे. कारण महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्री आपल्या बहिणीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीने चक्क पोलिसाला सर्वांसमोर थप्पड मारल्याची, शिवीगाळ केल्याची तसेच उद्धट भाषेत अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहिण आणि आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या वाय. एस. शर्मिला या वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख आहेत. वाय.एस.शर्मिला यांनी पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणी अटक करून त्याना १४ दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भरती परीक्षेच्या कथित प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी त्या आक्रमक झाल्या होत्या. घटनेच्या दिवशी राज्य लोकसेवा आयोगाची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी शर्मिला या SIT कार्यालयात जात होत्या. पोलिसांना त्यांना ताब्यात घ्यायचे होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांची गाडी गेटवरच अडवली. या वेळी शर्मिला यांच्या गाडीसमोर एक अधिकारी आणि काही हवालदार उभे राहिले. तेव्हा शर्मिला यांनी त्यांच्या ड्रायव्हरला वेग वाढवण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी चालकाला गाडीतून बाहेर ओढले. त्यामुळे संतापलेल्या शर्मिला पोलीस अधिकाऱ्यांबरोबर वाद घालू लागल्या, त्यानंतर शर्मिला यांनी तिथे सर्वांसमोरच थेट पोलिस अधिकाऱ्याला थप्पड मारली. अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्यानंतर महिला पोलिसांनी शर्मिला यांना ताब्यात घेतले आहे. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान पेपर लीक होऊन दीड महिन्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने शर्मिला यांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक झाल्या होत्या.
हैदराबादमध्ये सध्या पेपप फुटीच्या प्रकरणाची मोठी चर्चा आहे. हा प्रकार समोर आल्यापासून एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे आणि सरकारी रिक्त जागा भरण्यासाठीच्या तीन परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान शर्मिला यांनी अलीकडेच त्यांच्या पक्षाच्या समर्थनार्थ संपूर्ण तेलंगणात मोर्चा काढला होता.