Latest Marathi News
Ganesh J GIF

किल्ले सिंहगडावर फडकणार १०० फुटी भव्य भगवा ध्वज!; महापौरांकडून गडावर प्रत्यक्ष पाहणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या किल्ले सिंहगडावर आता तब्बल १०० फुटी भव्य भगवा ध्वज फडकणार आहे! महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारला जात असून, या भव्य ध्वजासाठी गडावरील जागेची प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्चित करण्यात आली आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी शुक्रवारी सिंहगडावर जाऊन या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान ध्वजस्तंभाची उंची, सुरक्षितता, संरचनात्मक बाबी आणि प्रशासकीय मंजुरीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर, एमटीडीसीचे चीफ रिजनल मॅनेजर हनुमंत खेडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ध्वज उभारल्यानंतर केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही त्याचे भव्य स्वरूप उठून दिसावे यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. यासाठी परिसरात अत्याधुनिक लाईटिंग आणि विद्युत रोषणाईची व्यवस्था केली जाणार आहे, ज्यामुळे लांबवरूनही हा भगवा ध्वज ध्येयमंत्र देणारा ठरेल.या पाहणीनंतर बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “सिंहगड हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या शौर्याची साक्ष देणारा ऐतिहासिक किल्ला आहे. या ऐतिहासिक भूमीवर उभारण्यात येणारा हा १०० फुटी भगवा ध्वज संपूर्ण महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आणि अस्मितेची प्रेरणा देणारे एक महान प्रतीक ठरेल.”

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!