‘भाजपात २५ एप्रिलला एक बडा राजकीय नेता प्रवेश करणार’
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाने सस्पेन्स, 'या' नेत्याकडे नजरा
नागपूर दि १९(प्रतिनिधी)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच राजकीय वर्तुळात मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये लवकरच एक बडा राजकीय नेता प्रवेश करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघाले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “प्रत्येक मंगळवारी भाजप पक्षात प्रवेश ठरला आहे. याही मंगळवारी एका मोठ्या नेत्याचा पक्ष प्रवेश होणार आहे. मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश आश्चर्यचकित करणारे असतील. कारण तो दिवस शुभ आहे. त्या दिवशी मी प्रशासकीय कामासाठी कार्यालयातच असतो, असे बावनकुळे म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या पक्षप्रेवेशाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, बावनकुळे यांनी पवार हे भाजपच्या संपर्कात नसल्याचा दावा केला आहे. मात्र ते जर भाजपमध्ये आले तयार त्यांचे स्वागतच होईल, असे ते म्हणाले. जर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारताच्या स्वप्नात सहभागी होण्यास तयार असतील तर आम्ही अजित पवारांचे भाजपमध्ये स्वागत करू, असेही ते म्हणाले आहेत. तसेच पवारांच्या भाजपात येण्याच्या बातम्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे सुरु झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल लिहिले आणि त्यामुळेच अजित यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात भाजपची कोणतीही भूमिका नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाबाबत बोलताना बावनकुळे म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार मधील लोक सगळे त्या घटनाकडे लक्ष ठेवून आहे. हॉस्पिटलमध्ये सगळी व्यवस्था गिरीश महाजन आणि सावंत यांच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे लक्ष ठेवुन आहेत. विरोधकांना आरोप करायला काही लागत नाही. विरोधकांनी उगाच राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.