
सुप्रिया सुळेंचा एक काॅल आणि त्यांना मिळाला निवारा
पाँडेचेरीत अडकलेल्या पर्यटकांची सुप्रिया सुळेंनी केली मदत
पुणे दि १५ (प्रतिनिधी)- खासदार सुप्रिया सुळेंना नागरिक हक्काने ‘ताई आपल्या हक्काची’ असे का म्हणतात याचा अनुभव पॉंडेचेरीत अडचणीत सापडलेल्या हेमंत पारगे, महेश पोकळे आणि मित्रपरिवाला आला आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचा परिपाठच सुप्रिया सुळे यांनी घालून दिला आहे.
त्याचे झाले असे की दोन आठवड्यांपूर्वी हेमंत पारगे,महेश पोकळे हे यांनी आपल्या मित्रांसोबत पॉंडेचेरीला फिरायला जाण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी त्यांनी तिथल्या एका हाॅटेलमध्ये रूम देखील बुक केली होती. पण जेंव्हा ते पाँडेचेरीला प्रत्यक्षात पोहोचले तेंव्हा त्यांना वेगळाच अनुभव आला.त्यांनी बुक केलेल्या रुम हाॅटेलने दुसऱ्या लोकांना देऊ केल्या होत्या.त्यामुळे बुकिंग करूनही त्यांना रुम मिळाल्या नाहीत त्यांनी नंतर इतर दुस-या हाॅटेलमध्ये चाैकशी केली पण गर्दीचा काळ असल्याने इतर हाॅटेलमध्तेही त्यांना रुम मिळाल्या नाहीत अशावेळी त्यांच्या जवळ गाडीतच झोपण्याचा पर्याय उरला होता. त्यावेळी त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून सुप्रिया सुळेंना फोन करुन आपली अडचण सांगितली. सुळेंनी त्यांना धीर देत मदत करण्याचे आश्वासन दिले. आणि रात्री १०:३० स्वतः फोन करत तुमची राहायची व्यवस्था जवळच्या स्नेहिंकडे केली आहे .एक व्यक्ती तुम्हाला घ्यायला येईल त्यांचा सोबत जा असा दिलासा देत काही वाटले तर शंका बाळगू नका कॉल करा. असे आवर्जुन सांगितले. त्यामुळे एका अनोळखी शहरात ९ जणांच्या राहण्याची सोय झाली. या मदतीबद्दल त्यांनी सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत.
खासदार सुप्रिया सुळे कायम मदतीला धावून जाणा-या खासदार म्हणून ओळखल्या जातात कोरोना काळातही त्यांनी अनेकांना मदत केली होती. त्याचबरोबर त्यांनी अनेकांना शैक्षणिक, आरोग्य, रोजगार यासारख्या कामात मदत केली आहे. त्यामुळेच त्यांच्या मदतीचा अनुभव आलेले लोक म्हणतात खासदार सुप्रिया ताई तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे…….