Latest Marathi News
Ganesh J GIF

‘बाॅलीवूडमधील विशिष्ट समूहामुळे माझे खुप नुकसान झाले’

अभिनेत्रीने बाॅलीवूडमधील गटबाजीवर मांडले परखड मत, काळीबाजू उघड करत म्हणाली, मला मानसिक तणाव...

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये नेपोटिझम आणि गटबाजी असल्याचे नेहमीच सांगितले जाते. अनेकदा अनेक अभिनेते किंवा अभिनेत्री यावर वक्तव्य करत असतात. हिंदी सिनेसृष्टीमध्ये ओळखीशिवाय कोणतेही काम होत नाही आणि नवीन कलाकारांना हे लोक संधी देत नाहीत असे अनेकदा सांगितले जाते. यावर आता एका अभिनेत्रीने भाष्य करत या विषयाला वाचा फोडली आहे.

सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटातून बाॅलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री डेझी शाहने याबाबत उघडपणे आपले मत मांडले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डेझीने बॉलीवुडमधील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ती म्हणाली की, बॉलीवूडमध्ये विशिष्ट समूह अस्तित्त्वात आहेत. मला सुद्धा अनपेक्षितपणे यातील एका समूहाचा हिस्सा बनवण्यात आले. यामुळे अनेक निर्माते मला म्हणायचे की, आम्ही तुला चित्रपटासाठी ऑफर देणार होतो पण, तू ज्या ग्रुपचा भाग आहेस तेवढे बजेट आम्हाला परवडणार नाही. निर्मात्यांचे बोलणे ऐकून मला अनेकदा धक्का बसायचा. चित्रपटाची कथा चांगली असेल, तर मी मानधनाचा विचार न करता काम केले असते. समूहाचा भाग असल्याने माझ्या करिअरवर मोठा परिणाम झाला. चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळत नसल्याने कालांतराने मला मानसिक तणाव येऊ लागला आणि यामुळे घराबाहेर पडणे मी बंद केले. मला कोणाला भेटण्याची इच्छा नव्हती, घराबाहेर पडायचे नव्हते. माझ्या करिअरबाबत मी अजिबात आनंदी किंवा समाधानी सुद्धा नाही. कारण, बॉलीवूडमधील काही ठराविक ग्रुप्समुळे माझे करिअर अजूनही चांगले सुरु झालेले नाही. सध्या मी फक्त आयुष्यातील सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. असे डेझी म्हणाली आहे.

डेझी शाह ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या लाईफ अपडेट चाहत्यासोबत शेअर करत असते. डेझी शाहने सलमान खानबरोबर ‘जय हो’मध्ये काम केले आहे. अलीकडेच ती ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये सहभागी झाली होती.त्याचबरोबर ती हेट स्टोरी ३, रेस ३ या चित्रपटांमध्येही झळकली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!