Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबादचे नारे

धक्कादायक प्रकार, पुण्यात नेमकं चाललय तरी काय?, पोलीसांकडुन दोघांना अटक

पुणे दि १५(प्रतिनिधी)- देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यात देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्साह होता. पण त्याच पुण्यात कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. पोलिस या तरुणांची कसून चौैकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू आहे. दोन व्यक्ती या शाळा बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास हे दोघे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत होते. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांनी दिलेले हे नारे ऐकले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे याच कोंढव्यात राष्ट्रीय तपास यंत्रणडकडून दोन दहशतवादी ताब्यात घेण्यात आले होते.त्यानंतर एनआयए कडून एका डॉक्टरला अटक करण्यात आली होती. हे सगळे कोंढवा परिसरात राहत होते. त्याच परिसरात आता दोन जणांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यानं सुरक्षेचा प्रश्न उभा राहत आहे. तसेच विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात काय चाललय असा प्रश्न उपस्थित राहत आहे. दरम्यान पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतलेल्या तरुणांचे नाव काय? हे कुठे राहतात याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही.

पुण्यात या आधीदेखील पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी झाल्याचा प्रकार घडला होता. पुण्यात पीएफआयच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यावेळी पोलीसांनी ६० ते ७० जणांना अटक केली होती. आजच्या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!