
…तरच अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
भाजपाची उपमुख्यमंत्री अजित पवार अवघड अट?, अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून ते लवकरच मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. ते याच महिन्यात मुख्यमंत्री होणार असे दावे करण्यात येत आहेत. दुसरीकडे शिंदे सरकारमध्ये देखील धुसफूस सुरु झाली आहे. पण आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे. तरीही अजित पवार- शरद पवार यांच्यात अधूनमधून भेटीचं सत्र होत असल्याने अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटी वाढत आहेत. शरद पवार हे सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल ही अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार समोर ठेवली आहे. त्यामुळं अजित पवार हे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी वारंवार त्यांना भेटत आहेत. अजित पवार हे शरद पवारांची भेट घेऊन त्यांना सोबत येण्यासाठी दया, याचना करत असावेत. असे देखील वडेट्टीवार यांनी म्हणाले आहेत. त्याचबरोबर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून थोडा संभ्रम आहे. मात्र आज शरद पवार यांच्या बीडमधील भाषणाने तो संभ्रम दूर होईल” असे संकेत वडेट्टीवार यांनी दिले आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याचा विचार केल्यास शरद पवार यांची सध्याची भूमिका पाहता अजित पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पणापासून दुर राहण्याची शक्यता अधिक आहे. कारण शरद पवार यांनी देखील भाजपसोबत जाण्यास साफ नकार दिला आहे. महत्वाचे म्हणजे नुकतीच अजित पवारांची पुण्यात उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट झाली आहे. ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती. तेंव्हापासूनच उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
शरद पवार एकीकडे भाजपा सरकार विरूद्ध बिगर भाजपा सरकार राज्यात विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरी कडे कधी नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर एकत्र दिसत आहेत. त्यामुळे संभम्र निर्माण झाला होता. पण शरद पवारांचा दाैरा सुरु झाल्यानंतर तो दुर होण्याची शक्यता आहे.