Latest Marathi News
Ganesh J GIF

पाण्यात फोटोशुट करत होते जोडपे अचानक लाट आली आणि…

जोडप्याचा अंगात शहारे आणणारा व्हिडिओ जोरदार व्हायरल, चिमुकलीने हाक देऊनही....

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे रेनी सीझन पिकनिक साठी अनेकजण बाहेर पडत आहे. पण अनेकवेळा ही पिकनिक जीवघेणी देखील ठरू शकते. अनेकदा सुचना देऊन सुद्धा लोक नको ते धाडस करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

पिकनिकसाठी फिरायला गेलेले लोक धोक्याच्या ठिकाणी फोटो काढण्याचे धाडस करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ याचे उदाहरण आहे. एक जोडपे आपल्या मुलांसह एका नदी आणि धबधबा असलेल्या ठिकाणी फिरायला गेले होते. त्यावेळी दोघेही भर पावसात पाण्याच्या प्रवाहाच्या शेजारील दगडावर बसून फोटो काढत होते. पण पाठीमागे येणाऱ्या लाटा वरचेवर वाढत होत्या. त्या लाटांची उंची देखील वाढत होती. पाणी दगडावर आदळून त्या दोघांच्या डोक्यावरून गेले तरीही ते तिथून उठत नाहीत. पण त्याचवेळी आणखी मोठी लाट येते आणि ते त्यामुळे पाण्यात वाहून जातात. विशेष म्हणजे त्यांची मुलगी त्यांना हाक मारत होती. तरीही हे जोडपे त्याकडे लक्ष न देता फोटो काढण्यात व्यस्त होते. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. पण नको ते धाडस केल्यामुळे या जोडप्याला आपला जीव गमावावा लागला आहे. निष्काळजीपणा या जोडप्याचा अंतास कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे.

@Shailendra97S नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. उत्तराखंड आणि हिमाचलमधील परिस्थिती पावसामुळे आणखीनच धोकादायक बनली आहे. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. तसेच पुराच्या पाण्यात जाऊ नये असेही आवाहन केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!