Latest Marathi News
Ganesh J GIF

‘कधी कोणाला सोबत घ्यायचं आणि कधी सोडायचं हे फडणवीसांना कळत’

भाजपा आमदाराचा शिंदे आणि पवार गटाला इशारा, देवेंद्र फडणवीसच सरकारचे हसयकमांड, जोरदार चर्चा सुरु

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- शिंदे गट भाजपा सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्याने ताणतणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीला महत्वाची खाती दिली गेल्याने शिंदे गटात तणावाची स्थिती आहे. अजित पवार यांना झुकते माप दिल्याने शिंदे गटाची गरज आता भाजपाला राहिली नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच भाजपा आमदारांनी एक वक्तव्य केल्याने वेगळीच चर्चा होत आहे.

शिंदे गट आणि अजित पवार गट सत्तेत आल्याने भाजपातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यादरम्यान भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणाले की, “आपल्या भारतीय जनता पार्टीने घेतलेला निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. आपलं नेतृत्व खूप सक्षम आणि खूप विचारी आहे. त्या नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला आपल्याबरोबर घ्यायचं, कोणाला सोडायचं, कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं आणि कोणाला कधी सोडायचं? हे सगळं आपल्या नेतृत्वाला माहिती आहे. मंत्रिमंडळ खाते वाटपात अनेक महत्वाची खाती राष्ट्रवादीला गेली असली, तरी कार्यकर्त्यांनी चिंतित होण्याचे कारण नाही. मला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा आदर आहे.  मात्र, सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसच हायकमांड आहेत, असे गोरे म्हणाले आहेत. यावेळी गोरे यांनी लोकसभा निवडणूकीवरही भाष्य केले आहे. “उदयनराजे भोसले यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला त्यांना पाहायचे आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागून विविध राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आपल्या सर्वांना करावयाचे आहे. जिल्हा भाजपमय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथनिहाय कामाला लागावे, असे गोरे म्हणाले आहेत. दरम्यान आमदार गोरेंनी केलेलं हे विधान नक्की कोणासाठी होतं याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.

भाजप नेत्यांकडून अनेकदा आपल्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचे वारंवार सांगितले आहे. चंद्रकांत पाटील, नवनीत राणा, चंद्रशेखर बावनकुळे यांनी याआधी असे वक्तव्य केले होते. पण आता भाजपा कोणाला सोबत घेणार आणि कोणाला सोडणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!