Just another WordPress site

पत्नीविषयी मित्र अपशब्द बोलला…आखाड पार्टीला बोलावून केला खून…! बघा नेमक काय घडल..?

पुणे शहर प्रतिनिधी –  पत्नीबाबत अपशब्द वापरण्याच्या कारणावरून दोघांनी तिसरा गुन्हेगाराला आखाड पार्टीला बोलावून निर्घृण खून केल्याची घटना घडली. पुण्यातील नवी पेठेतील (Navi Peth Crime) पुन्हा हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूला बुधवारी रात्री हा प्रकार घडला. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आनंद उर्फ बारक्या गणपत जोरी (वय 32) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, याप्रकरणी पोलिसांनी सुधीर उर्फ बंडू गौतम थोरात (वय 32)आणि संदीप उर्फ शेंडी सुरेंद्र नायर (वय 28) या दोघांना अटक केली आहे. याबाबत वैशाली गणपत जोरी यांनी तक्रार दिली आहे.

GIF Advt

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आनंद हा बंडू थोरात याच्या पत्नी बाबत अपशब्द वापरत होता. याचा राग थोरातच्या मनात होता. याच कारणावरून त्याने मित्र याला सोबत घेऊन आणि इतर मित्रांसोबत बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आनंद याला आखाड पार्टीसाठी बोलावले. सर्वजण त्या ठिकाणी गेले, दारू प्यायले. इतर सर्व मित्र निघून गेले. शेवटी थोरात जोरी आणि सँडी हे तिघेच त्या ठिकाणी थांबले होते. त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने जोरी याच्यावर वार करून त्याला ठार मारले. दरम्यान गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल (Navi Peth Crime) करून तपास केला असता वरील दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली आणि त्यांना अटक करण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!