पार्किंगच्या वादातुन तरुणीची महिलेला मारहाण
महिलेला केलेली मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद, कोंढव्यातील संतापजनक प्रकार
पुणे दि २०(प्रतिनिधी)- सोसायटीमध्ये गाडी पार्क करत असताना समोरच्या घराच्या गेटला धक्का लागल्याने गाडी पार्क करत असलेल्या महिलेला शिवीगाळ करत जोरात कानशिलात लगावल्याची घटना पुण्यातील कोंढव्यातुन समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. विश्वास भापकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विश्वास भापकर याचे घर फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंगला लागूनच आहे. त्यामुळे तो सतत पार्किंगच्या कारणावरून त्यांचे सोसायटीमधील लोकांबरोबर अनेकवेळा वाद झाले आहेत. त्याने अनेकवेळा धमकी देखील दिली आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी महिला ही कामावरून घरी परतत असताना आरोपी विश्वास याच्या घराच्या गेटवर गाडीची धडक लागली. त्यामुळे फिर्यादीने आरोपीची माफी मागितली. पण आरोपीने रागात फिर्यादी महिलेच्या कानशिलात लगावली. त्यानंतर ढकलून देण्याच्या उद्देशाने स्पर्श करून तिचा विनयभंग केला. नंतर धमकावत “जा तुला काय करायचं ते कर, माझं कोणी काही वाकड करू शकत नाही”, असं बोलून तिथून निघून गेला. या प्रकरणी महिलेनं कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, या प्रकरणी आरोपीवर विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत असल्याचं समोर येत आहे. फिर्यादी महिलेला या घटनेनंतर डाव्या कानाने ऐकायला येत नव्हते. त्यामुळे पोलीसांसमोर वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.