Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्राची क्रश असणारी अभिनेत्री नव्या फोटोशुटमुळे ट्रोल

चाहत्यांकडून फिरकी, पण भावी जोडीदाराबद्दल मोठा खुलासा, लग्नाची इच्छा व्यक्त

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील अनेकांची क्रश असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. प्राजक्ताने अल्पावधीत कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केले आहे. पण चाहत्यांकडून कायम काैतुक एैकणारी प्राजक्ता एका फोटोशुटमुळे ट्रोल झाली आहे.

प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर कायम चर्चेत असते.तिच्या आगामी व नवीन प्रोजेक्टबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती देत असते. याबरोबरच अनेक फोटोही प्राजक्ता शेअर करताना दिसते. पण फोटोमुळेच प्राजक्ताला ट्रोल व्हावे लागले आहे. प्राजक्ताने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाची पँट आणि निळ्या रंगाचा टॉप परिधान करत वेस्टर्न लूक केला आहे. प्राजक्ताने फोटोसाठी विविध पोझही दिल्या आहेत. पण त्यातील काही पोज चाहते आणि नेटक-यांना खटकल्या आहेत. तिला या पोजवरुन जोरदार ट्रोल करत तिची फिरकी घेतली आहे. यावेळी “सई ताम्हणकरबरोबर राहून तू पण विचित्र पोझमध्ये फोटो काढत आहेस प्राजू,” असे सांगत सई बरोबर न राहण्याचा सल्ला दिला आहे तर दोन पाय लांब करत दिलेल्या पोजमुळे “मुंबईला विकेट किपर पाहिजे” अशा शब्दात तिची खिल्ली उडवण्यात आली आहे. यावेळी एकाने तिला पुणेरी टोला लगावताना “एफसी रोडवरुन कपडे खरेदी केल्यावर घरच्यांना दाखवताना प्राजू,” अशी कमेंट करत ट्रोल केले आहे. अर्थात काही चाहत्यांनी तिच्या फोटोंचे भरभरून काैतुक केले आहे. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करत फोटो पाहून प्रेमाची कबुली दिली आहे. दरम्यान जुळून येती रेशीमगाठी’मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे.प्राजक्ताने सांगितलं की तिला लहानपणी अभिनेता सलमान खान खूपच आवडायचा, त्यावेळी आपण सलमान खानशी लग्न करावं अशी प्राजक्ता माळीची इच्छा होती.तिच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!