Latest Marathi News
Ganesh J GIF

दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेम केल्यामुळे मुलीची हत्या

वडीलांनीच केली मुलीची हत्या, प्रियकरानेही केली आत्महत्या, पहा कोठे घडली ही घटना?

बेंगलोर दि २८(प्रतिनिधी)- कर्नाटकात वडिलांनी आपल्याच मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिने दुस-या जातीतील मुलाशी प्रेम केल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलीची हत्या केली. मुलीची हत्या झाल्यामुळे तिच्या प्रियकरानेही आत्महत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

किर्ती असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तर गंगाधर असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. कर्नाटकच्या कोलारमधल्या बोदागुरकी गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार किर्ती पदवीचे शिक्षण घेत होती. किर्तीचं त्यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या २३ वर्षीय गंगाधरवर प्रेम होते. पण गंगाधर वेगळ्या जातीतील असल्यामुळे कीर्तीच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. यामुळे किर्तीच्या वडीलांनी तिला समज दिली होती. घटनेच्या दिवशी कीर्तीचा पिता कृष्णमूर्तीने कीर्तीला गंगाधरसोबतचे नाते तोडण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी कीर्तीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आत्महत्या दाखवण्यासाठी त्याने तिचा मृतदेह पंख्याला लटकवला. दुसरीकडे किर्तीची हत्या झाल्यानंतर तिचा प्रियकर तिच्या अंत्यविधीला उपस्थित होता. पण परत येत असताना त्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी कामसमुद्र पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किर्तीच्या वडिलांनीच तिची हत्या केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी कृष्णमूर्तीला अटक केली असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. पण देशात जातीच्या आधारावर भेदभाव होत असल्याचे भीषण चित्र दिसून येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!