
दंगल घडवण्याच्या प्लॅनसाठी मातोश्रीत बैठक झाली होती
भाजपाचा मोठा आरोप, चाैकशीची मागणी, महाराष्ट्रातील दंगलीमध्ये उद्धव ठाकरेंचा हात?
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १९९३ मध्ये दंगली जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीमध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड परिसरातील मुस्लिम फेरिवाल्यांवर हल्ला करावा, त्यानंतर दंगली भडकवण्याची जबाबदारी माझी असणार आहे, असे म्हटले होते. असा आरोप राणे यांनी केला आहे.
मुंबईत दंगली घडवण्यासाठी २००४ साली उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बैठक घेतली होती. असा आरोप राणे यांनी केला आहे. नितेश राणे म्हणाले की, महायुती सरकार राज्य अशांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, राज्यामध्ये दंगली भडकवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माणसांनी म्हणजे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी वारंवार केला. पण मी आज एक इतिहास उद्धव ठाकरेंना तारखेसकट आमि माणसांसकट सांगणार आहे. १३ ऑगस्ट २००४ रोजी मातोश्रीमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्थानिय लोक अधिकार समितीचे माजी सरचिटणीस आणि आता शिवसेनेचे खासदार ज्यांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे ते आणि स्वत: उद्धव ठाकरे या तिघांमध्ये मातोश्रीमध्ये बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले की, १९९२-९३ च्या दंगली जशा घडल्या त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आली तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. त्या ठिकाणी संबंधित दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितले की, चर्नी रोड आणि त्या परिसरातील काही भागात जे काही मुसलमान फेरीवाले आहेत त्यांच्यावर वस्तऱ्याने हल्ला करा आणि त्यानंतर मुंबईमध्ये दंगली घडवण्याची जबाबदारी माझी असेल. हे स्वत: उद्धव ठाकरे म्हणाले होते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर तसेच ९ महिने महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत होता, त्यामध्ये देखील उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीचा हात आहे का? तसेच मालवणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेमध्ये उद्धव ठाकरेंचा हात आहे का? याची देखील चौकशी करावी अशी मागणी राणे यांनी केली आहे. १९९९ पासून आजपर्यंत उद्धव ठाकरे सतत मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत आहेत. उद्धव ठाकरे हा किती कपटी आहे, हे मी तारखेसकट आणि पुराव्यासकट बोलत आहे. असा घणाणात राणे यांनी केला आहे.
राऊत आमच्या नेत्यांना भाषण माफिया बोलत असतात, पण तू किती मोठा भूमाफिया आहे? याचे पुरावे महाराष्ट्राला देणार आहोत. अलिबागच्या किहिम बीचवर तुला प्लॉट हवा होतो, म्हणून एका मराठी कुटुंबाला दमदाटी करून ही जमीन बळकावली. किहिम बीचवर रिसोर्ट बांधण्यासाठी कवडीमोल भावात जमीन घेतली आहे. असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे.