Latest Marathi News
Ganesh J GIF

गुलाल कुणाचा शिंदे कि ठाकरे उद्या फैसला

राज्याचा सत्तासंघर्षावर उद्या निकाल, महत्वाचा दिवस, शिंदे सरकार राहणार की जाणार?

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्या सगळ्यांचे लक्ष निकालाकडे असणार आहे.

सत्ता संघर्षाचा निकाल ११ किंवा १२ मे रोजी लागण्याची शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती. अशात ११ मे रोजी हा निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निकालाबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. काहींच्या मते शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरतील. तर काहींच्या मते हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची शक्यता आहे. आमदार अपात्र झाले तरी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धोका नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उद्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांना अपत्रा ठरवार की त्यांच्या बाजून निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ता संघर्षाच्या या सर्व सुनावणीदरम्यान १६ आमदारांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मनाला जात आहे. त्यामुळे आता उद्या न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे राजकारण्यांची धाकधूक वाढली आहे. दोन्हीबाजूंनी विजयाचे दावे करण्यात येत आहे. पण बहुतांश जाणकारांनी आमदार अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे आगामी राजकीय घडामोडीसाठी उद्याचा निकाल महत्वाची भुमिका पार पाडणार आहे.

सर्वाच्च न्यायालयामध्ये दोन्ही पक्षाने आपली बाजू मांडल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश निकाल देणार आहेत. त्यामुळे निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सर्वाच्च न्यायालयामध्ये दोन्ही पक्षाने आपली बाजू मांडल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश निकाल देणार आहेत. त्यामुळे निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!