Latest Marathi News
Ganesh J GIF

निकारागुआच्या सौंदर्यवतीने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा सोनेरी ताज

भारताला अपयश, तब्बल ८४ देशाच्या सौंदर्यवतींना मागे टाकतं जिकंली स्पर्धा, या उत्तराने जिंकले सर्वांचे मन

दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- सगळ्या फॅशन जगताचे लक्ष लागून असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाराग्वाची शेनिस पॅलासिओस हिने मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब जिंकला आहे. तिला मिस युनिव्हर्स २०२२ च्या विजेत्या अमेरिकेच्या आर’बोनी ग्रेबियलने मुकुट परिधान केला. या स्पर्धत भारताला जिंकण्याची संधी होती. पण भारताला अपयश आले.


मिस युनिव्हर्स या प्रतिष्ठित विजेतेपदासाठी ८४ हून अधिक देशांतील सुंदरांनी स्पर्धा केली. यावेळी मिस युनिव्हर्सच्या अंतिम स्पर्धेत जोरात चुरस होती. यावेळी उपांत्य फेरीत २० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या उपांत्य फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांमध्ये भारताची मॉडेल श्वेता शारदा हिचाही समावेश होता. श्वेता शारदा हिनं मिस इंडिया आणि मिस दिवा २०२३ चाही किताब जिंकला होता. कोणत्या एका महिलेचे आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल असा प्रश्न यावेळी निकारागुआच्या शेनिस पॅलासिओ हिला विचारण्यात आला होता. यावेळी तिने महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी वोलस्टोनक्राफ्टचं आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल असे उत्तर दिले होते. थायलंडची एन्टोनिया पोर्सिल्ड ही पहिली रनर अप ठरली, तर ऑस्ट्रेलियाची मोरया विल्सन ही दुसरी रनर अप ठरली. शेनिसला मिस युनिव्हर्स २०२३ चा मुकूट मिस युनिव्हर्स २०२२ अमेरिकेच्या आर’बोनी गेब्रियलने परिधान केला. यावेळी शेनिस आनंदाश्रू आवरता आले नाहीत. विशेष म्हणजे मिस युनिव्हर्सचे विजेतेपद पटकावणारी शेनिस पॅलासिओस ही निकाराग्वाची पहिली महिला ठरली आहे.

शेनिस पॅलासिओसने सेंट्रल अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ मॅनाग्वा येथून मास कम्युनिकेशन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. शेनिस पॅलासिओसने आतापर्यंत चार वेळा विविध सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. दरम्यान मिस युनिव्हर्सच्या यूट्यूब चॅनल आणि त्याच्या ट्विटर अकाउंटवरही ही स्पर्धा ऑनलाइन प्रसारित करण्यात आली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!