‘या’ अभिनेत्रीसोबत एका चाहत्याने केले धक्कादायक कृत्य
अभिनेत्रीने सांगितला तो धक्कादायक अनुभव, बघा नेमके काय घडले
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बाॅलीवूड सेलिब्रेटिंचे सर्वसामान्यांना कायमच आकर्षण राहिलेले आहे. पण त्यामुळे ब-याचदा त्यांना वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो.अनेक बॉलिवुड अभिनेत्री बऱ्याचदा त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट घटनांबद्दल खुलेपणाने बोलतात. नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्री यामी गौतमने तिच्यासोबत झालेला एक किस्सा सांगितला तो धक्कादायक होता.
यामी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती कुठेही दिसली तरी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक पुढे येतात. तिला चाहत्यांमुळे आलेला एक वाईट प्रसंगाचा खुलासा यामीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. ती म्हणाली “एका लहान चाहत्याने एक दिवस तिच्या स्टाफशी फोटो काढण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे यामीने फोटो काढायला लगेच परवानगी दिली. मात्र त्या चाहत्याने तिच्या नकळत तिचा एक व्हिडीओ केला. त्या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले. त्याच्या व्हिडीओवर एवढे सारे व्ह्यूज आणि कमेंट मिळाल्यामुळे तो असे अन्य सेलेब्ससोबतही करु शकतो. त्यामुळे सेलिब्रिटी आणि पॅपराजींच्या मध्ये एक मर्यादेची रेषा असायला हवी. असे रोखठोक मत तिने मांडले आहे. तसेच एका चाहत्याने तिचा हात ओढण्याचा प्रयत्न केला होता पण आपण त्याच्या कानाखाली आवाज काढला होता असेही यामीने सांगितले आहे.

यामी नुकतीच ‘लॉस्ट’ मध्ये दिसली होती. यामी येत्या काही दिवसांमध्ये अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीसोबत ‘ओह माय गॉड 2’ मध्ये दिसणार आहे. याचबरोबर ती ‘चोर निकल के भागा’ मध्येही दिसणार आहे. यामीने ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने दिग्दर्शक आदित्य धरसह जून २०२१ मध्ये आपली लग्नगाठ बांधली आहे.