Latest Marathi News
Ganesh J GIF

या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीचा भीषण अपघात

कार्यक्रमाला जात असताना अपघात, जाणून घ्या कशी आहे तिची तब्येत

श्रीनगर दि १५(प्रतिनिधी)- ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरघोस प्रतिसाद मिळत असून नुकताच या सिनेमाने १०० कोटींचा टप्पाही पार केला. पण एका कार्यक्रमाला जाताना अदा शर्मा हिचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाला आहे. रविवारी एका हिंदू यात्रेत सहभागी होत असताना हा अपघात झाला. यावेळी तिच्या सोबत सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि इतर सहकारी उपस्थित होते. त्यानंतर आता स्वतः अभिनेत्री अदा शर्माने देखील ट्विट करत आपल्या तब्बेतीची माहिती दिली. तिने या ट्विटमध्ये लिहिले की, ‘ मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघातासंदर्भात अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण माझ्यासह आमच्या टीममधील सर्व मंडळी ठीक आहेत. कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद’. असे शर्मा म्हणाली आहे.

द केरळ स्टोरी’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित होताच हा सिनेमा वादाच्या गर्तेत अडकला होता. मात्र, प्रदर्सजोत होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या सिनेमात ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचा दावा खोटा आहे, हा एक प्रोपगंडा सिनेमा आहे, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आला आहे. पण या सिनेमाने शनिवारी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!