Just another WordPress site

कमालच! नवरदेवाने एकाच मांडवात केले सख्ख्या बहिणीसोबत लग्न

नवरीने ती अट घातली आणि नवरदेवानेही होकार दिला, कारण एैकून तुम्ही थक्क व्हाल

जयपूर दि १५(प्रतिनिधी)- आजकाल तरूणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची चर्चा आहे. पण अशातच राजस्थानमध्ये मात्र दोन सख्ख्या बहिणींनी एकाच वराशी लग्न केले. या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. दोन्ही कुटुंबांची संमतीही होती. आणि हा विवाह कोणत्याही छुप्या मार्गाने झाला नसून मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. या लग्नाची जोरदार चर्चा आहे.

GIF Advt

हे प्रकरण राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील उनियारा येथील मोरझालाच्या झोपडिया गावातील आहे.नवरदेव हरिओम मीनाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तर दुसरीकडे सौंद्रा खडायाच्या धानी येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींपैकी मोठ्या बहिणीने उर्दूमध्ये एमए केले आहे. तर धाकटी बहीण आठवीपर्यंत शिकली आहे. रामप्रसाद मीणा याचे कुटुंबिया बाबूलाल मीणा यांची थोरली मुलगी कांता हिला पाहण्यासाठी आले होते. मात्र, कांताने एक अट घातली. ती म्हणजे, दोन्ही सख्ख्या बहिणी एकत्र लग्न करतील. ते मान्य असेल तरच पुढचा निर्णय होईल. नवरदेव हरिओमनेही होकार दिला आणि त्यानंतर कांता आणि सुमन यांचा विवाह उत्साहात पार पडला. वराने दोन्ही बहिणींसोबत मंडपात सात फेरे घेतले. हरिओम पदवीधर आहे. कांताने उर्दूमध्ये एमए केले आहे. दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. धाकटी बहीण सुमन आठवीपर्यंत शिकली आहे. दोन्ही बहिणींना आनंदी ठेवेन असा विश्वास हरिओमने व्यक्त केला आहे.

कांताची धाकटी बहीण सुमन ही मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. आणि मोठी बहिण कांता तिची काळजी घेते. सुमन तिच्यासोबत राहिली तर कांता तिची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकेल. म्हणूनच कांताने तशी अट घातली. आणि हरिओमच्या घरच्यांनी ती मान्य केली. त्यामुळेच हे लग्न पार पडले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!