Latest Marathi News
Ganesh J GIF

महिला दागिण्याच्या दुकानात चोरी करायला शिरली पण…

महिलेच्या फजितीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, ज्वेलर्सच्या दुकानात काय घडले?

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- घरफोडी, चोरी यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. चोर चोरी करण्याच्या नवनवीन कल्पना घेऊन येत असतात. पण कधी कधी नवीन कल्पना त्यांच्याच अंगलट येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याच चोराची चांगलीच फजिती झाली आहे.

एका महिलेने दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.पण तो पूर्णपणे फसला आणि ती अलगद पोलीसांच्या हाती लागली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दिसत आहे की, बुरखा घालून एक महिला ज्वेलर्सच्या दुकानात येते, सराफाला दागिने दाखवायला सांगते. आणि दागिने बघत असतानाच ती बॅगेतून एक स्प्रे काढते आणि सराफाच्या डोळ्यात मारते पण तिचा हा डाव फसतो, त्या स्प्रेनं सराफाला काहीही होत नाही. उलट सराफ लगेच त्या महिलेच्या मागे धावतो आणि तिला मारायला सुरुवात करतो. सराफाला काहीही झालं नाही हे पाहून ती महिलाच शॉक झाली असून तिला दुकानाच्या बाहेरही जाता येत नाही. तेवढ्यात आणखी एक व्यक्ती येतो आणि महिलेला पकडतो. नंतर ते पोलिसांना बोलावतात आणि त्या महिलेची रवानगी तुरुंगात होते. महिलेने ज्वेलर्सच्या दुकानात चोरीचा प्रयत्न केला, मात्र ती चांगलीच फसली. या व्हिडीओची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर होत आहे.

हा व्हिडिओ @CctvPicks खात्यावरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर ज्वेलर्स दुकानदाराचे काैतुक होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!