Latest Marathi News
Ganesh J GIF

घटस्फोट होऊनही या प्रसिद्ध अभिनेत्रीने साजरा केला करवाचाैथ

सोशल मिडीयावर तो व्हिडिओ पोस्ट केल्याने उडाली खळबळ, अभिनेत्रीला नवीन साथी मिळाला?

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- पती पत्नी हे नाते एक पवित्र नाते मानले जाते. आपल्या महाराष्ट्रात पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपोर्णिमा सण साजरा करतात. तर उत्तर भारतात करवा चाैथ नावाचे व्रत केले जाते. पण आजकाल करवा चाैथ सगळीकडे साजरा केला जात आहे. पण एका अभिनेत्रीने करावा चाैथ साजरा केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असते. तिने सोशल मिडियावर करवाचौथ साजरा करत शुभेच्छा दिल्या होत्या. पण मानसी नाईकचा काही महिन्याआधीच घटस्फोट झाला होता. मग ती कोणासाठी करवाचौथ साजरी करतेय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पाडला आहे. करवा चौथ निमित्त मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मानसी नव्या नवरीसारखी सजली आहे. ‘हम दिल दे चूक सनम’ या बॉलीवूड चित्रपटातील ‘चांद छुपा बादल मैं’ या गाण्यावर मानसीने रिल बनवला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मानसीने कॅप्शनमध्ये, ”हॅप्पी करवाचौथ. वेडे होऊन आणि मनापासून प्रेम करणाऱ्या सगळ्यांना करवाचौथच्या शुभेच्छा”, असं लिहिले आहे. बात अगर मोहब्बत की है तो जज़्बा बराबरी का होगा जो तुमने कुछ नहीं खाया सुबह से तो चांद भी तुम्हारा भूखा होगा ! अशी शायरी देखील मानसीने शेअर केली आहे. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने अनेक हिट गाण्यांमुळे वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तसेच मानसीने अनेक चित्रपटांतही काम केले आहे.

मानसी नाईकने प्रदिप खरेराबरोबर १९ जानेवारी २०२१ लग्नगाठ बांधली होती. त्याआधी दोघांनी एकमेकांना डेट केले होते. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या वर्षभरातच दोघांनी घटस्फोट घेत वेगळ होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत मानसीने घटस्फोटामागचं कारणही सांगितलं होते. लग्नानंतर त्यांच्यात खटके उडाल्याने घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!