Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात नजरेला नजर भिडवल्याने तरुणावर सु-याने वार

कदमवाक वस्ती परिसरात खळबळ, पुण्यात गुन्हेगार सुसाट

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असुन भयाण रुप घेत आहे. त्यातच पुण्यातील कदमवाक वस्ती परिसरात केवळ दोन तरुणांची नजरेला नजर भिडल्यानंतर वाद विकोपाला पोहोचला. या वादातून एका तरुणाने दुसऱ्यावर थेट धारदार सुऱ्याने वार करून त्याला जखमी केले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शिवम राखुंडे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी धीरज कांबळे व गणेश अनिल पांढरेकर यांना अटक केली आहे. तिघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत.कदमवाक वस्तीत एका प्रसिद्ध चहाच्या दुकानात ते एकत्र आले होते. त्यावेळी धीरज आणि शिवम यांची नजरेला नजर भिडली. त्यातून त्या दोघांत वाद झाला. पण नंतर शिवमने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या धीरजने शिवमला भेटण्यासाठी म्हणून बोलावले घेतले. शिवम त्याच्या मित्रांसोबत तेथे गेल्यानंतर धीरज आणि गणेशने त्याला मारहाण करत सुऱ्याने वार करत जखमी केले. या हल्ल्यात शिवम जखमी झाला असून, या हल्ल्यानंतर आरोपी फरार आहेत.  सध्या या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये पुणे परिसरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. पुण्यातील गुन्हेगारीवर विधिमंडळात देखील चर्चा झाली होती.अगदी लहानसहान कारणावरून जीव घेण्यापर्यंत वाद विकोपाला जाताना दिसत आहेत. पोलीस कारवाई करत असले तरीही पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना हा चर्चेचा विषय ठरत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!