Latest Marathi News
Ganesh J GIF

राज्यपाल कोश्यारींकडुन पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा अपमान

त्या व्हायरल फोटोमुळे राज्यपाल वादात, योगी अदित्यनाथही अडचणीत येणार?

मुंबई दि ६(प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादात सापडत असतात. महापुरूषांच्या अपमानावरून टीकेची धनी ठरलेले राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी जी शिवप्रतिमा योगी आदित्यनाथ यांना देण्यात आली त्यावरून वादंग निर्माण झाले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देताना दिसत आहेत. पण त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि योगी आदित्यनाथ या दोघांच्या पायात चपला घातलेल्या असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्या ठिकाणी हजर होते. आधीही शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते, आत्ताच्या काळातले आदर्श नितीन गडकरी आहेत असे म्हटल्यामुळे राज्यापाल वादात सापडले होते.तर त्याआधीही रामदारांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल असे वादग्रस्त विधानाचा वाद शमत नाही तोवर पुन्हा एकदा शिवरायांचा अपमान झाल्यामुळे राज्यपाल अडचणीत आले आहेत.

आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकारावरुन टीका केली आहे. ते म्हणाले राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलनं करा . बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय.. पायात पायताण घालून जर “शिवप्रतीमा” देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!