Latest Marathi News

जखमी रिषभ पंतला भेटायला रुग्णालयात पोहोचली अभिनेत्री?

अभिनेत्रीने शेअर केला रुग्णालयाचा फोटो, त्या फोटोमुळे चर्चेला उधाण

मुंबई दि ६ (प्रतिनिधी)- अपघातात जखमी झालेल्या रिषभ पंतवर सध्या मुंबईत उपचार सुरु आहेत. सध्या तो मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातच अभिनेत्री उर्वशी रौतेलाही मुंबईत आहे. आता उर्वशीने कोकिलाबेन रुग्णालयाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर ती कदाचित ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत.

रिषभ आणि उर्वशी एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा होत्या. त्यानंतर दोघं एकमेकांवर अनेकदा टीकाही केली होती. पण उर्वशी रौतेलाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रिषभ पंत दाखल असलेल्या रुग्णालयाचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला होता. या फोटोवरुन ती रिषभला भेटण्यासाठी गेली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रिषभच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर उर्वशीने स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोला तिने प्रार्थना असं इतकंच कॅप्शन दिलं होतं. पुढे हॅशटॅग देत प्रेम असंही कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं. त्यामुळे ते पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात अशी चर्चा सुरु झाली आहे.


रिषभचा ३० डिसेंबर रोजी कार अपघात झाला होता.तो दिल्लीवरुन रुरकीला निघाला होता. त्याचवेळी त्याची कार हमदापूर झालजवळ डिव्हाइडरवर धडकली होती.अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पाठीला, डोक्याला आणि पायाला मार लागला आहे. त्यामुखे शस्त्रक्रियेसाठी त्याला देहरादूनहून मुंबई आणण्यात आले आहे. मुंबई त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!