…म्हणून अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज, शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- उठावाची भाषा करत शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि ४० आमदार यांच्यात अलिकडे सतत वाद होत असल्याच्या चर्चा आहेत. प्रताप सरनाईक वादानंतर कृषिमंत्री अब्दूल सत्तार आणि मुख्यमंत्र्याचे पीए यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी सत्तार यांनी पीएला शिविगाळ केल्याची चर्चा आहे.
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठावल्यामुळे शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात होती, त्यावेळी त्यांच्या कामाचा आढावा देखील घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव सचिव खतगावकर यांच्याबरोबरअब्दुल सत्तार यांची कोणत्यातरी विषयावरुन वाद झाला.त्यामुळे संतापलेल्या सत्तार यांनी खतगावकर यांना शिवीगाळ केली. या वादानंतर काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी मध्यस्थी केली. त्यानंतर सत्तार तिथून निघून गेले, या घटनेमुळं यामुळं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. अगोदर प्रताप सरनाईक आणि आत्ता अब्दुल सत्तार यांनी थेट मुख्यमंत्र्यांच चॅलेंज दिल्याने शिंदे गटात आॅल इज नाॅट वेल असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेसोबत बंड केल्यावर शिंदे गटाच्या काही नेत्यांच्या वक्तव असो किंवा अधिकाऱ्यांना मारहाण करणं असो यामुळे शिंदे आणि फडणवीसांची डोकेदुखी चांगलीच वाढत आहे. सत्तार हे टीईटी वादात अडकल्यानंतरही त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. पण आता वादावर शिंदे काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.