Latest Marathi News

महिला आमदाराने केले चक्क पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत लग्न

या हटके लग्नाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा, जोडी एकदा बघाच

पंजाब दि १०(प्रतिनिधी)-पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या आमदार नरिंदर कौर भराज या लग्नबंधनात अडकल्या. विशेष म्हणजे, नरिंदर यांनी ‘आप’चेच कार्यकर्ते मनदीप सिंग लाखेवाल याच्यासोबत साध्या पद्धतीने लग्न केले. एका तरुण महिला आमदाराने पक्षाच्या कार्यकर्त्याबरोबर लग्न करण्याची ही बहुधा पहिलीच घटना आहे.

नरिंदर कौर भाराज या आपच्या सर्वात तरुण आमदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी संगरूरची जागा जिंकली होती. कौर यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी विजय इंदर सिंगला यांचा ३८ हजार मतांनी पराभव केला होता. विजय इंदर हे आधीच्या काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते, तरीही नरिंदर कौर यांनी त्यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. अशा राजकारणातील जायंट किलर भराज यांनी आप पक्षाचे कार्यकर्ता मनदीप सिंग लाखेवाल यांच्याशी विवाह केला. पटियालाच्या रोरेवाल गावात जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गावातील गुरुद्वारामध्ये हा विवाहसोहळा पार पडला. यात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नी डॉ.गुरप्रीत कौर सहभागी झाल्या होत्या. आमदार नरिंदर कौर यांचे पती मनदीप सिंह लाखेवाल हे भवानीगडमधील लाखेवाल गावचे रहिवासी आहेत. मनदीप यांची गणना आपच्या सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये होते. संगरूर विधानसभेत मीडिया प्रभारी म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती.

प्रेमात काहीही पाहिले जात नाही हे खरे आहे. मग तो कितीही मोठा व्यक्ती असला तरी देखील. आमदाराने एका कार्यकर्त्याबरोबर केलेल्या लग्नातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे या महिला आमदाराने अतिशय साध्या पद्धतीने विवाह करत एका नवा आदर्श घालून दिला आहे सध्या सोधल मिडीयावर हे लग्न चर्चेत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!