सुप्रिया सुळेंबद्दल अब्दुल सत्तार नको ते बरळले
राष्ट्रवादी आक्रमक, शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा बेतालपणा सुरुच
ओैरंगाबाद दि ७(प्रतिनिधी)- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही खोके देऊ”, असे म्हटले आहे. त्याच्या या बेताल वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडानंतर शिंदेसह ४० आमदारांनी पन्नास खोके घेतलेत असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच आरोपाबद्दल सत्तार यांना विचारले असता त्यांनी बेताल वक्तव्य केले आहे. यावर टिका होऊ लागल्यानंतरही सत्तार यांनी आपला बेतालपणा कायम ठेवला आहे. ते म्हणाले “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. या टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी असे म्हणत २४ तासाचा अल्टिमेटम दिला आहे. तर आदित्य ठाकरेंनीही अब्दुल सत्तार यांच्यासारखी घाणेरडी लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवेत का, असे लोक मंत्री म्हणून चालणार आहेत का’, असा सवाल विचारत शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
अवघडे मंत्र्यांचं! अब्दुल सत्तार On air महिला नेत्याला शिव्या देत आहेत. #निषेध #राष्ट्रवादी @surajvchavan @NCPspeaks pic.twitter.com/F1d0zAcS7n
— Omkar Wable (@MrWabs) November 7, 2022

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सत्तार यांच्या बंगल्यावर हल्लाबोल केला होता. तर राज्यातही राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदेसमोर शक्तीप्रदर्शनच्या तयारीत असलेल्या सत्तारांनी वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा करत माफी मागितली आहे. तर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही सुळेंची माफी मागितली आहे.