Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे दोन्ही ठाकरे बंधुना चॅलेंज

मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का, युती तुटणार?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आणि मनसेचे तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील आहेत. यावेळी शिंदेनी उद्धव ठाकरेंवर टिका केली. पण मनसेही यामुळे आक्रमक झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले की, तुम्ही एका विश्वासाने आला आहात. त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. हे सरकार तुमचे, आमचे सगळ्यांचे आहे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. या सरकारमध्ये १७० आमदारांचे मजबूत बहुमत आहे. काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. कारण दररोजचा ओघ पाहून सर्वच पक्ष चिंतातूर झाले आहेत. असाच ओघ राहिला तर समोर राहणार काय? त्यामुळे नवीन बातम्या पसरवल्या जात आहेत. मध्यावधी निवडणुका लागतील, असे बोलत आहेत. अरे तुमचे लाॅजिक काय असा सवालही शिंदेंनी केला आहे.तसेच शिंदे गटात सर्व आलबेल असल्याचेही शिंदे म्हणाले आहेत. पण ठाकरे गटाबरोबरच मनसेच्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देत शिंदेनी दोन्ही ठाकरेंना आव्हान दिले आहे.

मनसे आणि शिंदे गटात आगामी निवडणूकांमध्ये युतीची चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे अलीकडे ब-याच ठिकाणी एकत्र दिसत आहेत. अशावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देत मुख्यमंत्री दबावाचे राजकारण करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे शिंदे गट एकत्र येणार की स्वबळावर लढणार हे आगामी काळातील घडामोडीवरून स्पष्ट होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!