Latest Marathi News
Ganesh J GIF

अश्लील रॅप साँगवरून अभविपकडून पुणे विद्यापीठात जोरदार राडा

कुलगुरुंच्या अंगावरती फेकले निवेदन, अभाविपच आक्रमक, राडा कॅमे-यात कैद

पुणे दि २४(प्रतिनिधी)- पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी विद्यापीठ परिसरात अश्लील रॅप साँगच्या चित्रीकरणावरून प्रशासनाला जाब विचारला. यावेळी तोडफोड देखील करण्यात आली आहे. हा प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे.

काही दिवसांपूर्वी शुभम जाधव नावाच्या एका तरुणाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एक रॅप सॉंग शूट केलं होतं. या रॅप सॉंगमध्ये अश्लील भाषेचा भडीमार होता. विद्यापीठाच्या आवारातील आणि हॉलमधील काही दृश्य या रॅप सॉंगमध्ये होती. हे रॅप सॉंग प्रदर्शित झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. परवानगी नसताना अश्लील भाषेत केलेले रॅप साँग चे शूटिंग झाली कशी याची चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या आम्ही ऐकून घेतले आहेत एक समिती नेमली आहे समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती कुलगुरू कारभारी काळे यांनी दिली. त्यावरुनच आज विद्यापीठ व्यवस्थापनाची बैठक सुरू होती. या बैठकीला सिनेटचे सदस्यही उपस्थित होते. त्यावेळी अचानक ABVP चे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आत शिरले. यावेळी कोणत्याही प्रकारची चर्चा न करत आंदोलकांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, यावेळी अश्लील रॅप साँगचं चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्यावरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांचे न झालेले पदवी ग्रहण सोहळा व डिग्री सर्टिफिकेट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशातील प्रवेश प्रलंबित आहे ते लवकरात लवकर देण्यात यावे. परीक्षांचे प्रलंबित निकाल व लागलेल्या निकालांमध्ये चुका झालेल्या आहेत. स्पोर्ट स्टेडियमचे उद्घाटन होऊनदेखील विद्यार्थ्यांना वापरण्यास बंदी बंदी आहे ते करण्यात यावं. BScBEd च्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेचा १०० टक्के लाभ न देणे आदी मुद्दे यावेळी आंदोलकांनी उपस्थित केले आहेत.

यासंदर्भात स्टुडंट हेल्पींग हँडसचे कुलदीप आंबेकर म्हणाले, विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनेने आंदोलन करुन काचा फोडल्या, कुलगुरु-प्रकुलगुरु यांच्या समोर चालू घोषणा दिल्या. त्या मिटींगमध्ये त्यांनी अडथळा आणला यावर सुरक्षा विभाग,पोलीस प्रशासन काय करतेय? यांच्यावर गुन्हे दाखल करणार का, रँप करणार्‍याच्या बाबतीत जी भूमिका विद्यापीठानी घेतली ती आता घेणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!