Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात या कारणामुळे मद्यधुंद महिलेचा हाॅटेलमध्ये राडा

झिंगाट महिलेचा मॅनेजरसह ग्राहकांवर दादागिरी, पोलीसांनाही धमकी देत मारहाण

पुणे दि २४(प्रतिनिधी)-पुण्यात एका मद्यधुंद महिलेने भाकरी न मिळाल्याने हॉटेलमध्ये राडा घातला. इतकेच नाही तर त्यांना थांबवायला आलेल्या पोलीस महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील श्री सागर हॉटेलमध्ये ही घटना घडली. पोलीसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. महिलेने पोलिसांचा चावा घेत जखमी केले.

या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून केदारी नगर वानवडी येथील कुणाल टेरेस येथे राहणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री सागर हॉटेल येथे आरोपी महिला जेवण करण्यासाठी गेली होती. तेथे जेवणात भाकरी न मिळाल्याने दारूच्या नशेत तिने हॉटेलमधील कामगार व मॅनेजर यांना शिवीगाळ केली. तसेच, इतर ग्राहकांच्या जेवणात पाणी टाकून त्यांना त्रास दिला. या प्रकाराची माहिती हॉटेल मॅनेजरने जवळच असलेल्या पोलिस ठाण्यात दिली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस नाईक श्री सागर हॉटेलमध्ये गेल्या. त्यांनी महिलेची समजूत काढून, तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने वर्दीवरील नेमप्लेट बघून ” मी कोण आहे ते तुला दाखवतेच” असे बोलून त्यांची नेमप्लेट जोरात ओढली आणि शिवीगाळ केली. तसेच, पोलिस नाईक महिलेच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास पकडून पिरगळून चावा घेत जखमी केले. त्यानंतर मात्र पोलीसांनी तिला पोलीसी खाक्या दाखवत अटक केली आहे.

घटनेवेळी महिला पूर्ण नशेत होती, केवळ भाकरी का मिळाली नाही म्हणून तिने सगळे हाॅटेल डोक्यावर घेतले होते. त्यात कहर म्हणजे महिला पोलीस नाईक वनिता माने यांना जखमी केले दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!