Latest Marathi News
Ganesh J GIF

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे हे रेकाॅर्ड तोडणे महामुश्कील

वाढदिवसादिवशी ऑस्ट्रेलियाकडून मिळाला मोठा सन्मान, वाचा ते रेकाॅर्ड आणि सन्मान

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. इतर ठिकाणी क्रिकेट एक खेळ असला तरी तो भारतात एक धर्म आहे. आणि सचिन देव हे कोणीही नाकारू शकत नाही. सचिनने आपल्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, अनेक विक्रम केले आहेत, जे तोडणं कदापि शक्य नाही. याची आपण माहिती घेऊ

सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २०० कसोटी आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यात त्याने कसोटी कारकिर्दीत ३२९ डावांमध्ये १५,९२१ धावा तर वनडेमध्ये १८,४२६ धावा केल्या आहेत. ह एक विक्रम आहे. त्याचबरोबर सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. तर १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही सचिनने केला आहे. हाही एक विक्रम आहे. सचिनने २०० कसोटी सामने आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा सचिन हा एकमेव फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने २०५८ चौकार आणि ६९ षटकार लगावले आहेत.सर्वाधिक विश्वचषक खेळण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण सहा विश्वचषक खेळले १९९२ साली तो पहिला विश्वचषक खेळला होता तर २०११ साली शेवटचा विश्वचषक खेळला. त्यावर्षी भारताने विश्वकप जिंकला होता. त्यामुळे सचिनचे विश्वचषक विजयाचे स्वप्न साकार झाले होते. सचिनने २००३ च्या विश्वचषकात गोल्डन बॅट देखील पटकावलेली.

सचिनच्या वाढदिवसानिमित्त ऑस्ट्रेलियाने त्याला खास भेट दिली आहे. सचिन तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे त्याच्या नावाच्या गेटचे अनावरण करण्यात आले आहे. तेंडुलकरचे भारतानंतर SCG हे आवडते क्रिकेट मैदान म्हटले होते. त्या मैदानात आता सचिन नावाच्या गेटमधून प्रवेश असणार आहे. त्यामुळे अनोखी भेट सचिनला मिळाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!