Latest Marathi News
Ganesh J GIF

एसीबीने महिला कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाच घेतानाच्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल, उत्तम कामाबद्दल मिळालेला पुरस्कार

हरियाना दि २९(प्रतिनिधी)- हरियानातील भिवानीत दाखल झालेला गुन्ह्यात दिलासा देण्यासाठी एका व्यक्तीकडून महिला पोलीस अधिकाऱ्यानं चक्क पाच हजार रुपयांची घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला पोलीसला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

भिवानीच्या बवानखेडी येथील ही घटना असून सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे. हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात आरोपी मुन्नी देवी या काम करतात. याच पोलीस ठाण्यात परिसरातील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी हा गुन्हा मागे घेत पुढील कारवाईपासून संरक्षण देण्यासाठी आरोपी मुन्नी देवीनं महिलेला पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार महिलेनं या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि तक्रारदार महिलेकडून लाच घेत असतानाच अधिकाऱ्यांनी आरोपी महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या १० नोटाही जप्त करण्यात आल्या. भिवानी लघु सचिवालयाजवळ ही कारवाई करण्यात आली.हरयाणातील भिवानी आणि हिसार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत एका महिला पोलीस सब इन्स्पेक्टरला रंगेहात पकडण्यात आले.

 

काही दिवसांपूर्वीच यूपीत एका पोलीस अधिकाऱ्याला लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता हरयाणात महिला पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्यामुळं खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील महिलेला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई केली जात असल्याचं भिवानी पोलिसांनी सांगितलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!