Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

निवडणूक आयोगाची घोषणा, १० मे रोजी मतदान, १३ मे रोजी निकाल

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून १० मे रोजी मतदान होणार आहे. १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटक राज्यातील एकुण २२४ जागांसाठी  मतदान होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून २४ मे रोजी त्यांच्या सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.

कर्नाटकात २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला १०४ काँग्रेसला ८० तर जनतादल सेक्युलरला ३७ जागा मिळाल्या होत्या. मात्र बहुमत थोडक्यात हुकल्याने तेव्हा भाजपला सरकार स्थापन करता आले नव्हते. जनता दल सेक्युलरने काँग्रेससह सरकार स्थापन केलं होते. पण पक्षातल्या बंडखोरीमुळे ते सरकार पडले होतं. त्यानंतर भाजपच्या येडीयुरप्पांचे सरकार आलं. सध्या कर्नाटकची धूरा बसवराज बोम्मईंच्या खांद्यावर आहे. कर्नाटकमध्ये सध्या भाजपच्या ११७ जागा आहेत. काँग्रेसच्या ६९ जागा आहेत तर जेडीएसच्या ३२ जागा आहेत. कर्नाटकमध्ये एकुण ५.२२ कोटी मतदार आहेत. तर ९.१७ लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. याचबरोबर १०० पेक्षा अधिक वय असणारे १६ हजार मतदार आहेत. तसेच ज्यांचे वय ८० असे मतदार आपल्या घरातून मतदान करु शकणार आहेत. निवडणूकीसाठी २० एप्रिलला अर्ज भरण्याची अखेरची तारीख असणार आहे. तर १० मे रोजी मतदान आणि १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर एक लोकसभा आणि तीन विधानसभेची पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. ओडिसामध्ये विधानसभा, उत्तर प्रदेश विधानसभा, मेघालय विधानसभा, जालंधर लोकसभेची निवडणूक जाहीर केली आहे. कर्नाटकात एकूण २२४ मतदारसंघ आहेत. निवडणूकीची घोषणा जाहीर झाल्याने लगेच आचारसंहिता लागू झाली आहे. कर्नाटकात ५८ हजारांहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. कर्नाटकात एकूण ३१ जिल्हे आहेत. तर कर्नाटकात लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत.

काँग्रेसने निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच २५ मार्च रोजी १२४ उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणा विधानसभेतून तर कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार हे कनकापुरातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाही लवकरच आपली यादी जाहीर करणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!