Latest Marathi News
Ganesh J GIF

डाळिंबाच्या बागेत काम करताना महिलेसोबत घडले अघटित

फवारणी करत असताना पतीच्या डोळ्यांसमोर पत्नीचा तडफडून मृत्यू, नेमके काय घडले प्रियंकासोबत

सोलापूर दि १४(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. डाळिंबाच्या झाडाला फवारणी करताना ट्रॅक्टर ब्लोअरच्या रॉडमध्ये साडीचा पदर अडकून एका विवाहितेचा मृत्यू झाला आहे. गळफास बसून पतीदेखत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या ह्रदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

प्रियांका प्रवीण येलपले असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रवीण येलपले व पत्नी प्रियांका हे दोघे मिळून रविवारी शेतातील डाळिंब बागेत ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने झाडाला फवारणी करत होते. प्रवीण येलपले पुढे बघून ट्रॅक्टर चालवीत होते. पत्नी प्रियंका ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने झाडांना स्लरी ओतत होत्या. यादरम्यान ब्लोअर ढवळणी रॉडला प्रियांकाच्या साडीचा पदर गुंडाळून तिला गळफास लागला आणि ट्रॅक्टर जाम चालू लागला. इतक्यात प्रवीण याने पाठीमागे वळून पाहिले असता प्रियांकाच्या गळ्याला साडीचा गळफास बसल्याचे दिसून आले. साडीचा पदर अडकून प्रियांका तडफडत होती. गळफास घट्ट बसल्याने प्रियांकाला ओरडता देखील येत नव्हते. प्रवीण यांनी ताबडतोब ट्रॅक्टर थांबवून प्रियंकाच्या गळ्याला बसलेला साडीचा गळफास काढला व उपचाराकरिता तिला तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी प्रियंकाला मृत घोषित केले.

रविवारी दुपारच्या सुमारास सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे ही घटना घडली. या घटनेमुळे सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. डोळ्यांदेखत पत्नीचा जीव जात असल्याचे पाहून पतीने खूप आरडाओरड केली, पण दुर्दैवाने पत्नीचा मृत्यू झाला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!