Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

अजित पवार होणार नवे मुख्यमंत्री, सन्मानाने राजीनामा देण्यासाठी हे कारण करणार समोर? मोठी खेळी

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक पार पडल्यापासून राजकारणात आणखी एक भूकंप घडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे देखील अनेक कार्यक्रम रद्द करत आपल्या सातारा येथील गावी आले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलंश्रे आहे. यावरून विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील सरकार सैरभैर झाले असून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपाचा डाव आहे. शिंदेंना आजारी करून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात याच पार्श्वभूमीवर भेट झाली असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची खेळी निष्प्रभ करण्यासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्याची खेळी केली जाऊ शकते, असेही सांगितलं जात आहे. त्याचबरोबर तेरा दिवसांच्या अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेत केवळ दोन वेळा गेले, तर विधानसभेत चार वेळा. त्यांची उपस्थितीही दीड-दोन तासांची होती. ही उपस्थिती, त्यांचा सहभाग, सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं टाळणे, आराम करायला बाहेर जाणे, तब्येतीची काळजी घेणे शंकास्पद आहे, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राला त्यांच्या तब्येतीची काळजी असते, त्यामुळे याबाबत खुलासा स्पष्ट होणे अपेक्षित आहे. कारण सीएमओ कार्यालय आणि प्रवक्ता यांच्यात त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवरून परस्परविरोधी विधान केली जात असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर अजित पवार भेटीबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यास लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांना आरामाची गरज आहे, त्यामुळे आम्ही सर्व आमदार एकत्र येऊन त्यांना जबरदस्तीने दवाखान्यात पाठवणार आहोत, असे विधान आमदार संजय शिरसाट यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे सन्मानजनक निरोप देता याचा यासाठी आजाराचे कारण पुढे केले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण कोणत्या भूकंपाची भर पडणार ते पहावे लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!