Latest Marathi News

धक्कादायक! दिल्लीत शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला

धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद, एकजण ताब्यात

दिल्ली दि १४(प्रतिनिधी)- दिल्लीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मुलीचा चेहरा संपूर्ण भाजला असून डोळ्यांनाही इजा झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

द्वारका परिसरात सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. तरुणी आपल्या लहान बहिणीसोबत जात होती, तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने त्या मुलीवर अ‌ॅसिड फेकले. तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे.मुलगी ८ टक्के भाजली आहे. एका मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान आणखी एक मुलगा प्रमुख संशयित म्हणून समोर आला असून आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे द्वारका डीसीपींनी सांगितले.ही घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली असून तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत महिलांसोबत विनयभंग आणि गैरवर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच पुन्हा एकदा दिल्लीतून ही अ‌ॅसिड हल्ल्याची बातमी समोर आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!