ओैरंगाबाद दि १४(प्रतिनिधी)- औरंगाबादमध्ये नुकतेच राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य आणि देशातील महत्वाच्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगण्यात आले ज्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची चिंता वाढली आहे. तर उद्धव ठाकरे यांना गुड न्यूज देण्यात आली आहे.
या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली आहे पाहूया कस असणार आहे त्यांचे भविष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी- पंतप्रधान मोदी यांच्या कुंडलीत राजयोग आहे. त्यामुळे ते २०२४ साली देखील पंतप्रधान बनतील, तर त्यावेळेस भाजप लोकसभेच्या ४१८ जागा जिंकेल. पण २०२८ साली पंतप्रधान मोदी आपल्या पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्याला जबाबदारी देतील.
राहुल गांधी- राहुल यांच्या कुंडलीत देखील राजयोग आहे. मात्र त्यांच्या कर्म स्थानातील गुरु तसेच षष्टमस्थानातील रवी मंगळ हे ग्रह त्यांना पंतप्रधान पदापासून दूर ठेवतील. त्याचबरोबर त्यांना पक्षाअंतर्गत विरोधाचा सामना करावा लागणार आहे.
अरविंद केजरीवाल- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुंडलीत राजयोग आहे. ते २०२६ पर्यंत मुख्यमंत्री असतील. पण २०२६ नंतर त्यांना आपली जबाबदारी दुस-यावर सोपवावी लागेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुंडलीनुसार सध्याचा काळ भाग्योदयाचा आहे. तसेच कुंडलीत राजयोग आहे. मात्र ते मुख्यमंत्रीपदावर राहण्याची शक्यता कमी आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- फडणवीस यांच्या कुंडलीत अष्टमस्थानातील गुरु महाराजांचे भ्रमण चालू असल्या कारणाने त्यांना पक्षातून भरपूर विरोध तर होणार आहेच. तसेच त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागेल पण कुंडलीतील बुधादित्य नावाच्या राज योगामुळे ते पुन्हा एकदा मोठे पद प्राप्त करतील. पण ते पद कोणते याबाबत मात्र खुलासा करण्यात आला नाही.
उद्धव ठाकरे- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भविष्यवाणी सांगतांना ठाकरे यांच्या कुंडलीनुसार त्यांचे सहकाऱ्यांसोबत मतभेद होतील. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. पण उद्धव ठाकरे यांना जानेवारीपासून चांगले दिवस येणार आहेत.