Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसरमध्ये गाईचे पाय बांधून अनैसर्गिक अत्याचार

पुण्यात १६ वर्षीय तरुणाचे विकृत कृत्य, विकृती विरोधात संताप

पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यातील हडपसर परिसरात एका अल्पवयीन मुलाने मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. ही संतापजक घटना १३ डिसेंबरला घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फुरसुंगी परिसरात राहतात. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जर्सी जातीची गाय बांधली होती. दरम्यान रात्रीच्या वेळी १६ वर्षीय अल्पवयीन तरुणाने या गाईचे पाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.हडपसर पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.

एका मुक्या प्राण्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याची विकृती समोर आल्याने शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपी तरुणावर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहावं लागेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!