Latest Marathi News
Ganesh J GIF

सैराटच्या आर्चीसाठी रिंकू राजगुरू नव्हे ‘या’ अभिनेत्रीची झालेली निवड

नागराज मंजुळेचा मोठा खुलासा, एका कारणामुळे तिने गमावला सिनेमा, ती अभिनेत्री कोण?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याची हटके केमेस्ट्री तुफान गाजली होती. या कलाकारांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. पण आता एक नवीनच माहिती समोर आली आहे. सैराटच्या आर्चीसाठी रिंकु पहिली निवड नसल्यचा खुलासा झाला आहे.

या सिनेमामध्ये आर्ची ही भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरूने साकारली होती. मात्र, या भूमिकेसाठी नागराज मंजुळे यांनी अन्य एका अभिनेत्रीला पहिली पसंती दिल्याचं समोर आले आहे. आर्चीच्या भूमिकेसाठी आधी खूप मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते.नुकतंच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री सायली पाटीलने खुलासा करत सांगितलं की, आर्चीच्या भूमिकेसाठी जवळजवळ तिची निवड झालीच होती. पण तिला काम करायचं नव्हतं. याबाबत तिने नागराज मंजुळेंनाही सांगितलं. त्यांनतर पुढे आणखी मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. सिनेमात काम करून अभिनय करण्यासाठी सायली इतकी उत्सुक नव्हती. त्यामुळे सायलीने सैराट साठी काम केलं नाही. सायलीने सैराट सिनेमाची ऑफर नाकारली.पुढे सैराट – आर्ची आणि रिंकू राजगुरू तिघेही सुपरहिट ठरले. पण सायलीला याचं दुःख नाही. नागराजने ४ वर्षांनी सायलीची झुंड साठी निवड केली. आता सायली नागराज आणि आकाश ठोसर सोबत घर बंदूक बिरयानी सिनेमात दिसणार आहे. सायली म्हणाली “माझ्या ४ ते ५ ऑडिशन झाल्यानंतर नागराज सर म्हणाले आता तुझी जवळपास निवड करण्यात आली आहे. पण मी त्यांना म्हणाले मला नाही करायचे. कारण माझ्याकडून तरी असे काही नव्हते ती भूमिका मला करायची आहे. तो विषय तिथेच थांबला त्यानंतर ‘सैराट’ आला आणि मग ४ वर्षानंतर सरांनी मला ‘झुंड’साठी विचारले.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.


नागराज मंजुळे हे लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!