Just another WordPress site

एसटी तिकिटात पन्नास टक्के सवलतीनंतर महिला सुसाट

एसटीत महिलावर्गाची तुफान गर्दी, महिला राॅक कंडक्टर शाॅक, हे मजेदार व्हिडिओ पहाच

पुणे दि १९(प्रतिनिधी)- शासनाने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के प्रवासमध्ये सूट दिल्यानंतर प्रवासासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर लाल परीच्या प्रवासाचा आस्वाद घेण्यासाठी भरगच्च महिला एसटीत चढत असतानाचा व्हिडिओ आणि त्यानंतर कंडक्टर चक्क एसटी बसच्या सीटाहून तिकीट काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या सवलतीनंतर महिला वर्ग एकदम सुसाट झाला आहे.

सोशल मीडियाच्या व्हिडिओमध्ये दिसत असलेली एसटी बस आणि हा व्हिडिओ नेमका कुठला हे समजू शकला नाही. मात्र, सध्या या व्हिडिओमुळे बस कंडक्टरची तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे. बस महिलांमुळे भरगच्च झाली आहे. मुंगी शिरायलाही जागा नसलेल्या बसमध्ये कंडक्टर चक्क स्पायडर मॅन बनत तिकीट काढताना दिसत आहे. तर आणखी एका व्हिडिओत बसमध्ये बसणाऱ्या महिलांची तुडुंब गर्दी पहायला मिळत आहे. सरकारने ५० टक्के महिलांना सूट दिल्यानंतर महिलाही प्रवासासाठी एसटी महामंडळाला प्राधान्य देताना दिसत आहेत. महिलांचा वाढता उत्साह बस स्थानकावर पहायला मिळत आहे. त्यामुळे महिला वर्ग सध्या वाट पाहीन पण एसटीनेच जाऊन असे म्हणताना दिसत आहे. दरम्यान महिलांना ही सुविधा दिल्याने नोकरदार प्रवासी महिलांना तसेच, गावी नियमित जाणाऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे. काही महिला कामानिमित्त रोज प्रवास करतात. त्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे.

GIF Advt

 

एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात १७ मार्च २०२३ पासून महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. याचा पुरेपूर लाभ महिला घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!