Latest Marathi News
Ganesh J GIF

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मुख्यमंत्री शिंदेच्या मुलाचा हात?

श्रीकांत शिंदेचे कार्यालय अनिल जयसिंघानीच्या जागेत, एकनाथ शिंदेवरही निशाना

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याच्या प्रकरणात बुकी अनिल जयसिंघांनी याच्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल जयसिंघांनीला देखील अटक करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

विधानसभेत बोलताना या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भाजपाने उद्धव ठाकरे आणि जयसिंघाणी यांचा फोटो ट्विट करत ठाकरे गटाला लक्ष्य केले होते. आता त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय अनिल जयसिंघानी याच्या जागेवरच असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. त्या म्हणाल्या “उल्हास नगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या… किरीट भाऊंनी याचा शोध घ्यावा. ज्या अनिल जयसिंघानियाच्या नावाने अनेक आरोप केले जातात त्यांच्या जागेत श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कसे? ती जागा कोणाची? कोणाच्या नावावर? खरेदी विक्रीची कागदपत्रे तपासा,असे आव्हान आंधारेंनी दिले आहे. त्याचबरोबर “२०१५ साली अनिल जयसिंघानी या पठ्ठ्यानं शिवसेनेत यायचं ठरवलं होतं. उल्हासनगरमध्ये राहणारा माणूस म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतला माणूस. हा माणूस मातोश्रीपर्यंत येतो म्हणजे वेळ कुणी घेतली असेल याच्यासाठी? एकनाथ शिंदे होते. हा विचार करण्यासारखा भाग आहे की एकनाथ शिंदे आणि अनिल जयसिंघानी यांचे संबंध काय होते?” असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याच्या प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे.फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना थेट महाविकास आघाडी आणि ठाकरे गटावर काही गंभीर आरोप केले होते. पण आता शिंदेचेही नाव आल्याने खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!