Just another WordPress site

बिग बॉसमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या अभिनेत्रीचा नवा लूक आला समोर, आत्मविश्वासाने म्हणाली ठरल...

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेली मीरा जगन्नाथ चौथ्या सीझनमधील वाइल्ड कार्ड एण्ट्रीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली होती. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून मीराने टेलिव्हिजन विश्वात लोकप्रियता मिळवली आणि त्यानंतर बिग बॉस मराठीने तिला विशेष ओळख मिळवून दिली. पण आता ती यातुन बाहेर पडली आहे. पण लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

GIF Advt

स्टार प्रवाहवर सोमवारपासून म्हणजेच ५ डिसेंबरपासून नवी मालिका सुरू होत आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरू होत असून मीरा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मीराचा या मालिकेतील लूकही समोर आला आहे. मीराने सोशल मीडियावर तिचा हा लूक शेअर केला आहे. या मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘फुलाला सुंगंध मातीचा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर त्याजागी ही मालिका सुरू झाली आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील तिचा लूक आत्मविश्वासपूर्ण वाटत आहे. यामध्ये फॉर्मल अशा लूकमध्ये मीरा दिसत आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मीरा वेंधळी होती त्यामुळे तिच्या आत्ताच्या लुकबद्दल विशेष उत्सुकता असणार आहे.

मीरा जगन्नाथ गेला आठवडाभर ‘बिग बॉस मराठी सीझन ४’ मध्ये होती. तिने महेश मांजरेकरांसोबतचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. या सीझनमध्ये चॅलेंजर म्हणून आलेले विशाल निकम आणि मीरा केवळ आठवडाभरासाठीच होते. मीराच्या बिग बॉसमध्ये येण्याने चाहत्यांना आनंद झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!