Latest Marathi News

गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर

निवडणूकीत आपमुळे समीकरणे बदलणार, बघा कोणाला किती जागा

अहमदाबाद दि ५(प्रतिनिधी)- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. राज्यातील एकूण १८२ जागांपैकी गेल्या निवडणुकीत भाजपला ९९ जागा तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. तर, अपक्ष आणि छोट्या पक्षांना ६ जागा मिळाल्या होत्या. पण यंदा आपचे सुद्धा आव्हान होते. आता मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले असून आपमुळे समीकरणे बदलली आहेत.

गुजरातच्या २०२२ च्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस विरोधात आपनं देखील उमेदवार उभे केले आहेत. जन की बात यांच्या एक्झिट पोलनुसार १८२ जागांपैकी भाजपला १२९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला ४३ जागा, आपला १० जागा इतरांना एकही जागा न मिळण्याचा अंदाज आहे. पी मार्क या संस्थेच्या अंदाजानुसार भाजपला १३८, काँग्रेसला ३६, आपला ६ आणि इतरांना २ जागा मिळण्याची शक्यता आहे. टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला १२५ ते १३०, काँग्रेसला ४० ते ५० आपला ३ ते ५ आणि इतरांना ३ ते ७ जागा मिळू शकतात. गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी होण्याची शक्यता आहे. भाजपला आतापर्यंत सर्वाधिक १२७ जागा मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये टाइम्स नाऊ- नवभारतने या वृत्तवाहिनेने ETG सोबत एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार हिमाचल प्रदेशात भाजपच्या खात्यात ३८ जागा येणार असल्याचे दिसत आहे. तर, काँग्रेस पक्षाला फक्त २८ जागा मिळताना दिसत आहेत. अॅक्सिस माय इंडिया-आज तकच्या सर्वेक्षणानुसार हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस ४४ टक्के मते मिळवून आघाडीवर आहे, तर भाजप ४२ टक्के मतांसह सरकारमधून बाहेर पडताना दिसत आहे. आपला फक्त २ टक्के मते मिळत आहेत, तर इतरांना १२ टक्के मते मिळत आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये काटे कि टक्कर पहायला मिळत आहे.


दिल्ली महापालिका निवडणुकीत इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, आम आदमी पक्षाला १४९ ते १७१ जागा मिळू शकतात. तर भाजपची मजल ६९ ते ९१ जागांपर्यंत जाऊ शकते. काँग्रेसला केवळ ३ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अन्यांना ५ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्ली पालिकेतील केजरीवाल भाजपाला धक्का देण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!