Latest Marathi News

महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीला मिळाला हा मानाचा पुरस्कार

घरातील 'तो' फोटो शेअर करत झाली भावूक, बघा कोणामुळे झाली भावूक

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकजण तिच्यावर अक्षरश: फिदा आहेत. जणू ती महाराष्ट्राच्या तरुणाईची क्रश आहे. अशी प्राजक्ता माळी पुन्हा चर्चेत आली आहे.


प्राजक्ता माळीने एक पोस्ट करताना महत्वाची गोष्ट सांगितली आहे. पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.प्राजक्ताने आजवर आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक पुरस्कार मिळवलं आहेत. तिच्या घरातील एक कोपऱ्यात तिनं आजवर मिळालेल सारे पुरस्कार ठेवलं आहेत. नुकताच तिला ‘झी युवा सन्मान २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं. ‘तेजस्वी चेहरा’ हा पुरस्कार देऊन प्राजक्ताचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्राजक्ता काहीशी भावूक झाली आहे, पुरस्कार मिळाल्यानंतर तिने काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत पोस्ट लिहिली आहे.प्राजक्तानं या पुरस्कारासोबत घरात अन्य पुरस्कार ठेवलेली जागा चाहत्यांना दाखवत लिहिलं आहे कि, ‘घरातले 2 कोपरे कौतूकानं भरत चाललेत ह्याचा खूप आनंद आहे.’ ती पुढे म्हणाली कि, ‘परवा “झी युवा सन्मान २०२३ तेजस्वी चेहरा पुरस्कार” मिळाला. पाठीवर कौतुकाची थाप मिळाली की प्रोत्साहन मिळतं, उत्साह वाढतो..’ या पुरस्काराचं श्रेय प्राजक्तानं आई- वडील, ध्यान, प्राणायाम, योगा आणि हास्यजत्रेला दिलं आहे.प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोच्या सूत्रसंचालनात व्यस्त आहे. तसेच तिचा प्राजक्तराज नावाचा पारंपारिक दागिन्यांचा व्यवसाय देखील आहे.

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. अनेकांनी प्राजक्ताला शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यातील एका चाहत्यानं प्राजक्ताला शुभेच्छा देत अभिनयातील तेजस्वीतेला पांडु मुळे नुकताच सन्मान मिळाला. आता योग,प्राणायाम,आणि आध्यात्मामुळे चेहऱ्यावरील तेजस्वीतेला ही सन्मानित केलं गेलय’ अशी कमेंट करत लक्ष वेधलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!