Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

पण आंदोलनातून आत्तातरी माघार नाही, बैठकीत काय चर्चा झाली, शेतकरी नेते काय म्हणाले

ठाणे दि १६(प्रतिनिधी)- नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर आज महत्वाची बैठक पार पडली.यानंतर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे शेतकरी आपला मोर्चा उद्या १७ मार्चला मागे घेणार असल्याचं आमदार विनोद निकोले यांनी म्हटले आहे. लाँग मार्च बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाची भेट घेतली. या भेटीनंतर शेतकऱ्यांशी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत उद्या सभागृहात झालेल्या चर्चेवरक निवेदन देणार असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. लाँग मार्च मागे घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले आहेत. पण शेतकऱ्यांच्या वतीने “आजच्या चर्चेतील मुद्यांचे इतिवृत्त उद्या विधीमंडळात सादर केले जाईल. त्यावरील मान्यतेनंतर संबंधीत खात्यांच्या सचिवांना दिले जाईल. त्यानंतर त्याचे लिखीत पत्र हाती पडल्यावर लाँग मार्च नाशिकला परत जाईल. तोपर्यंत सध्या वाशिंद येथे मुक्काम असल्याने तिथेच आदिवासी, शेतकरी व कार्यकर्ते थांबतील अशी माहिती देण्यात आली आहे. याआधी असाच लाँग मार्च काढण्यात आला होता. त्यांच्या मागण्यांबाबत आश्वासन दिले होते. यापुर्वी सरकारच्या वतीने दिलेली आश्वासने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसेंनी पाळली नाहीत, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.

मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील, अतुल सावे, पालकमंत्री दादा भुसे आदी मंत्री होते. लाँग मार्चचे नेते डॉ. अशोक ढवळे, डॉ. डी. एल. कराड, माजी आमदार जे. पी. गावित, उदय नारकर, डॉ. अजित नवले, इरफान शेख, उमेश देशमुख, अर्जुन आडे, श्रीमती मंजुळा आदी उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!