महाराष्ट्राची क्रश असलेली अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात?
अभिनेत्रीची सोशल मिडीयावर पोस्ट चर्चेत, पारंपारिक पेहरावाने वेधले लक्ष, म्हणाली "नववधू प्रिया मी बावरते…"
मुंबई दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीची नेहमीच चर्चा होत असते. अनेकांचा क्रश असलेली प्राजक्ता लग्न कधी करणार? असा प्रश्न तर तिला नेहमीच विचारला जातो. या चर्चांवर प्राजक्ता माळीने कधीही स्पष्टीकरण दिलेले नाही. पण त्यातच आता पुन्हा एकदा प्राजक्ताच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत. नुकतेच प्राजक्ताने पारंपारिक साज परिधान करत फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये प्राजक्ता अप्रतिम दिसत आहे. हिरव्या बांगड्या, नाकात नथ, गळ्यात मोहनमाळ, कानात बुगडी असा अस्सल मराठमोळा साजश्रृगांर तिने केला आहे. या फोटोंना तिने “नववधू प्रिया मी बावरते…”, असे कॅप्शन तिने फोडींना दिले आहे. त्यामुळे कॅप्शन वाचून प्राजक्ता लग्न करतेय का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, पुढे लगेचच प्राजक्ताने लग्न करत नसल्याचं स्पष्ट केले आहे. “नाही नाही नाही…मी लग्न करत नाहीये, “छोटा लग्नसराई संच” launch करतीए.. अर्थातच “प्राजक्तराज- पारंपरिक मराठी साज” मध्ये. तुमच्या लग्नसराईसाठी…भरपूर discount सहीत,” असे प्राजक्ताने सांगितले आहे. त्यामुळे सुरु झालेल्या लग्नसराईसाठी प्राजक्ताने पारंपारिक दागिण्यांचा एक संच विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. त्यासाठी हे फोटोसेशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान प्राजक्ताने तिच्या पहिल्या खरेदीचा किस्सा सांगितला आहे. जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत काम करत असताना मधुगंधा कुलकर्णी हिने दिलेल्या सल्ल्यामुळे आपण पहिले घर खरेदी करु शकलो असे प्राजक्ताने सांगितले आहे. प्राजक्ता आज अभिनेत्री असण्यासोबतच एक उद्योजिका आणि व्यावसायिकादेखील आहे. तिचा प्राजक्तराज या नावाने दागिण्यांचा ब्रँड आहे. तर, तिचं स्वत:चं फार्महाऊसदेखील आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहचली. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. प्राजक्ता मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिची रानबाजार वेबसिरीज चांगलीच गाजली होती. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.