लग्नाच्या काही महिन्यानंतरच अभिनेत्रीने दिली गुडन्युज
सोशल मिडीयावरील ती अफवा अखेर खरी ठरली, सोशल मिडीया पोस्ट चर्चेत, म्हणाली तुमची प्रार्थना...
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- आपल्या चित्रपटांपेक्षा इतर कारणांमुळे चर्चेत राहणारी आणि नुकतीच लग्नबंधनात अडकलेली अभिनेत्री स्वरा भास्कर आई होणार आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर ही गुड न्यूज दिली आहे. काही महिन्यापूर्वीच ती राजकारणी फहाद आझमसोबत विवाह बंधनात अडकली होती.
स्वरा आणि फहाद हे आई-बाबा होणार आहेत. नुकतीच स्वरानं खास पोस्ट शेअर करुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. स्वराने सोशल मीडियावर फहाद अहमदसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोला स्वरानं कॅप्शन देत लिहिले आहे की, ‘कधीकधी तुमच्या सर्व प्रार्थनांची उत्तरं तुम्हाला मिळतात! धन्य, कृतज्ञ आणि उत्साही भावनांनी आम्ही नवीन जगात पाऊल ठेवले आहे.’ यावेळी स्वराने ‘कमिंग सून’. ‘कुटुंब, ‘ऑक्टोबर बेबी’, असे हॅशटॅग वापरले आहेत. स्वरा आणि समाजवादी पक्षाचा नेता फहद यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये नोंदणीकृत विवाह केला होता. त्यानंतर काही दिवसांनी या लग्नाचा सेलिब्रेशनही करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासूनच स्वराच्या प्रेगन्सींची चर्चा सुरू होती. मात्र तेव्हा स्वरा किंवा फहाद यांनी काहीच भाष्य केले नव्हते. तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करताच सर्व सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्वरा भास्कर ही आउट – ऑफ – द- बॉक्स चित्रपट करणारी अभिनेत्री आहे. स्वरा नेहमी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असते.स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांचा संसार आता फुलणार असून घरात पाळणा हलणार असल्याने दोन्ही परिवारात आनंदाचे वातावरण आहे.