हॉलिवूडनंतर ही अभिनेत्री आता जपानी चित्रपटात झळकणार?
अभिनेत्रीच्या करिअरचा आलेख उंचावला, हाॅलीवूडपटात झळकणार
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आई झाली झाले. तिने ६ नोव्हेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. हे जरी असले तरी तिने चित्रपटसृष्टी सोडली नाही. ती आता हॉलीवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. पण आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे.
बाॅलीवूड हॉलिवूडनंतर आता आलिया भट्ट जपानी चित्रपटात काम करणार आहे. मॅरी क्लेअरशी नुकत्याच झालेल्या संवादामध्ये तिने हा खुलासा केला आहे. तिला आता जागतिक चित्रपटांमध्ये काम करायचे आहे जेणेकरून तिचा अभिनय आणखीन समृद्ध होईल. म्हणूनच तिला हॉलिवूडनंतर आता जपानी चित्रपटात काम करायचे आहे.ती म्हणाली की “मला स्वतःला सतत आव्हान देत राहणे आणि अस्वस्थ करणाऱ्या भूमिका साकारात राहणे अशी माझी कल्पना आहे. जर मला भाषा कशी बोलायची हे कळल्यास मी पहिला चित्रपट जपानी भाषेतला करेन. मला स्वतःला कंटाळा येऊन नये म्हणून मी स्वतःला सतत प्रेरित करत असते. मला स्वतःला एका साच्यात ठेवायचे नाही. मला जेवढं शक्य आहे तितकं मी एक्स्प्लोर करणार आहे. केवळ हॉलिवुड चित्रपटात काम करणे अथवा जो येईल कुठून ही आलेला आशयात मला काम करायचे नाही. असे ही बाॅलीवूड दिवा म्हणाली आहे.

आलियाने ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘हम्प्टी शर्मा की दुलहनिया’, ‘कपूर अँड सन्स, गंगुबाई’ यांसारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट तिने केले आहेत. आलिया आता झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे तर हॉलिवूडच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटात ती काम करणार आहे. एकंदरीत लग्न झाल्यानंतर देखील आशियाच्या करिअरचा ग्राफ उंचावत असल्याचे दिसत आहे.