मुंबई दि २५(प्रतिनिधी)- भारतीय संघाने न्युझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली जिंकल्यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंड विरूद्ध पराभव झाला. न्यूझीलंड जिंकल्याचा जितका आनंद त्यांच्या चाहत्यांना झाला. पण भारत हरल्याचा तितकाच किंवा त्यापेक्षा जास्त आनंद पाकिस्तानी अभिनेत्रीला झाला. शेहर शेनवारीने खास ट्विट करत भारतीय चाहत्यांनी डिवचले आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री शेहर शेनवारीने विशेष ट्विट करत भारतीय खेळाडूंची खिल्ली तर उडवलीच, त्यासह चाहत्यांनाही डिवचलं. ‘भारत हरल्यानंतर जी मजा येते, तशी मजा कोणत्याच सूरात किंवा तालात नाही,’ असे ट्विट तिने केले आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारताला सामना गमवावा लागला. श्रेयस अय्यरच्या ८०, शिखर धवनच्या ७२ आणि शुबमन गिलच्या ५० धावांच्या जोरावर भारताने ५० षटकात ७ बाद ३०६ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या संघाने हा सामना ७ गडी राखून जिंकला. टॉम लॅथमच्या नाबाद १४५ आणि केन विल्यमसनच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने १७ चेंडू राखून भारताचा पराभव केला. शेनवारीने भारतीय संघाच्या पराभवावर डिवचल्यामुळे भारतीय चाहते तिला ट्रोल करत आहेत.

Jo maza bharat ko haar mein hai woh na sur mein hai na taal mein hai. Long live Jimmy Neesham 😁#INDvsNZ
— Sehar Shinwari (@SeharShinwari) November 25, 2022
शेनवारीने याआधीही टी २० सामन्यात जर झिम्बाब्वेनं भारतीय संघाला पराभूत केले तर मी झिम्बाब्वेच्या नागरिकाशी लग्न करेन, असे ट्विट केले होते. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. पण भारताने झिम्बाब्वेचा पराभव करत शेनवारीचा स्वप्नभंग केला होता.